राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास दृकश्राव्य माध्यमात !

By Admin | Updated: June 8, 2015 02:35 IST2015-06-08T02:35:04+5:302015-06-08T02:35:04+5:30

महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीतील कोकण विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा ९ जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

State drama competition travels in audio mode! | राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास दृकश्राव्य माध्यमात !

राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास दृकश्राव्य माध्यमात !


मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीतील कोकण विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा ९ जून २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने गेल्या ६० वर्षांतील राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास उलगडणार आहे. या समारंभात स्पर्धेच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या ध्वनी-चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी कोकण विभागातून हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ११९ संस्थांनी, तर बालनाट्य स्पर्धेत ३४ संस्थांनी नाटके सादर केली. कोकण विभागात मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, गोवा आणि दिल्ली या स्पर्धा केंद्रांवरील प्राथमिक फेरीत उत्तम कामगिरी केलेल्या कलाकारांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देऊन गौरविण्यात येईल. तसेच उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन, रौप्यपदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे या वेळी वितरीत करण्यात येणार आहेत.

Web Title: State drama competition travels in audio mode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.