शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'१०० रुपये देतो म्हणाले अन् उन्हात बसवलं; हातात फक्त वडापाव दिला, पाणीही दिलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:19 IST

BJP: मात्र आपण नेमका निषेध कसला करतोय? याची माहिती नसल्याने गर्दीतली काही लोकं हतबल असल्याचं पाहायला मिळत होतं.

ठळक मुद्देठाकरे सरकारविरोधातील भाजपाच्या आंदोलनाचा फज्जा पैसे देऊन गर्दी जमवल्याचं झालं उघड कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा प्रश्नच नाही, भाजपाने फेटाळले आरोप

पुणे - राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजपाने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. पुण्यातही अशाप्रकारे भाजपाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. पण या आंदोलनाला आणलेली गर्दी पैसे देऊन बोलवल्याचं समोर आलं. यातील बहुतांश लोकांना सरकारचा निषेध कशासाठी करतोय याची माहितीच नसल्याचं आढळून आलं. भाजपाने मात्र या आरोपाचं खंडन केले आहे. 

मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक भाजपानं दिली होती. राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं.  यामध्ये शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार आणि मागील शासनाने घेतलेले निर्णय बदलणे यासारख्या अनेक मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. पुणे येथे जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शहरातील ६ मतदारसंघातून कार्यकर्ते जमा झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री दिलीप कांबळे हे नेते आंदोलनस्थळी उपस्थित होते. या आंदोलनासाठी रस्त्याशेजारी छोटं व्यासपीठ बांधलं होतं, त्याच्यासमोर आंदोलकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. गर्दीमुळे वाहतुकीला फटका बसू नये यासाठी मतदारसंघनिहाय गर्दीचं विभाजन केले होते. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु होती. 

मात्र आपण नेमका निषेध कसला करतोय? याची माहिती नसल्याने गर्दीतली काही लोकं हतबल असल्याचं पाहायला मिळत होतं. यातील आंदोलक शहरातील विविध भागातून नगरसेवकांनी आणले होते. सिंहगड रोड येथील रहिवासी असलेल्या दीपाली पाटोळे आपल्या मुलांसह आंदोलनाला आल्या होत्या. 'पुणे मिरर' या इंग्रजी दैनिकाने तिच्याशी बातचीत केल्यानंतर तिने सांगितले की, आमच्या भागातील एका महिलेसोबत मी इथं आली आहे. आमचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी आम्हाला येथे येण्यासाठी सांगितले. म्हणून आम्ही आमच्या भागातील महिलांसोबत याठिकाणी आलो, यासाठी आम्हाला पैसे मिळतील असं सांगण्यात आलं. 

तर कामगार वस्तीमधील राजुरबाई कांबळे म्हणाल्या की, आमच्या भागातील कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं येण्यासाठी सांगितले. यासाठी मला १०० रुपये देतील असं म्हणाले पण मला या उन्हात बसवून फक्त वडापाव दिला आहे. साधं पाणीही दिलं नाही. मला पैसे मिळतील की नाही याचीही खात्री नसल्याचं त्या म्हणाल्या.  याच वस्तीतील आणखी एक रहिवासी शोभा सोनवणे म्हणाल्या, आमच्या भागातील नेते अशोक लोखंडे यांच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मेट्रोच्या कामामुळे आम्हाला घरं सोडण्यास सांगितले आहे. पण आमचं अद्याप पुनर्वसन केले नाही. याच विषयावर चर्चा करतील या विचाराने मी इथं आली. त्याचसोबत या गर्दीत असणाऱ्या राजेंद्र ढवळे यांनी भाजपासाठी काम करतो असा दावा केला. मी रोजंदारीवर काम करतो, याठिकाणी आल्यानंतर पैसे देऊ असं सांगण्यात आलं. माझ्यासोबत ५० ते ६० माणसं आली आहेत. आम्हाला निषेधाची माहिती नाही, आमच्या हातात बॅनर्स देण्यात आले. काहीतरी पैसे मिळतील यामुळे काम बुडवून याठिकाणी आलो असं त्यांनी सांगितले. 

या संपूर्ण प्रकाराचं भाजपाने खंडण केले आहे. याबाबत जगताप यांनी सांगितले की, मी माझ्या मतदारसंघातील १०० ते १५० कार्यकर्त्यांना निषेध करण्यासाठी यायला सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा प्रश्नच नाही. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी लावला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार