राज्य बँकेला झाला ३९० कोटींचा नफा

By Admin | Updated: September 7, 2016 05:29 IST2016-09-07T05:29:56+5:302016-09-07T05:29:56+5:30

राज्य सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ३९० कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर २४२.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेच्या अलिकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती देण्यात आली

State Bank's profit of Rs 390 cr | राज्य बँकेला झाला ३९० कोटींचा नफा

राज्य बँकेला झाला ३९० कोटींचा नफा

मुंबई : राज्य सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ३९० कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर २४२.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेच्या अलिकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम.एल.सुखदेवे, सदस्य अशोक मगदूम, के.एन.तांबे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आदी उपस्थित होते.
बँकेने सर्व सभासदांना १० टक्के इतका लाभांश दिला. बँकेच्या ठेवींमध्ये १३ टक्के वाढ होऊन त्या ११ हजार २६८ कोटींवर पोहोचल्या. जिल्हा बँकांना राज्य बँकेने वाढीव कर्जमर्यादा दिल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज देणे शक्य होत आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: State Bank's profit of Rs 390 cr