राज्य बँकेच्या प्रशासकपदी अनासकर, महागावकर

By Admin | Updated: July 2, 2017 03:46 IST2017-07-02T03:46:28+5:302017-07-02T03:46:28+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनासकर (पुणे) आणि अविनाश महागावकर (सोलापूर) यांची राज्य शासनाने

State Bank Administrator Anaskar, Mahagaonkar | राज्य बँकेच्या प्रशासकपदी अनासकर, महागावकर

राज्य बँकेच्या प्रशासकपदी अनासकर, महागावकर

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनासकर (पुणे) आणि अविनाश महागावकर (सोलापूर) यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. कर सल्लागार असलेले अनासकर हे नॅशनल फेडरेशन आॅफ अर्बन को आॅपरेटिव्ह बँके अ‍ॅण्ड क्रेडिट सोसायटी, नवी दिल्लीचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थांचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
अविनाश महागावकर हे सोलापूरच्या लोकमंगल मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे संचालक आहेत. लोकमंगल फाऊंडेशनचे ते संचालक असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. सहकार, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. राज्य बँकेचे सध्या एम. एल. सुखदेवे, ए. ए.मगदूम आणि के.एन. तांबे हे प्रशासक आहे.

Web Title: State Bank Administrator Anaskar, Mahagaonkar