शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'चिपी विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयानं काम करतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:49 IST

Chipi Airport: नारायण राणेंनी काल पत्रकार परिषद घेत उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हटलं होतं.

नागपूर: सिंधुदूर्गात झालेल्या चिपी विमानतळ उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलं. तसेच, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणालेत. यावर आता विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

नागपूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नारायण राणेंचा चीपी विमानतळाच्या निर्माण कार्यात मोठा वाटा आहे. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं, त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता याच विमानतळावरुन विमान उडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

समन्वयान काम करायचंफडणवीस पुढे म्हणाले, हे विमानतळ कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी नारायण राणे आणि आमचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं समन्वयानंच काम करायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादाची काही लढाई नाही. राणेंचं जे काही योगदान आहे ते कुणीही नाकारु शकत नाही', असं फडणवीस यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते नारायण राणे ?नारायण राणे यांनी काल मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 'मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही', असं राणे म्हणाले. तसेच, येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना