राज्यात 1,741 गावे तंटामुक्त
By Admin | Updated: September 18, 2014 02:28 IST2014-09-18T02:28:58+5:302014-09-18T02:28:58+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत 2क्12-13 या वर्षात राज्यातील एक हजार 741 गावे तंटामुक्त झाली असून, 47 गावांना विशेष शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यात 1,741 गावे तंटामुक्त
प्रकाश लामणो
ल्ल पुसद (जि़ यवतमाळ)
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत 2क्12-13 या वर्षात राज्यातील एक हजार 741 गावे तंटामुक्त झाली असून, 47 गावांना विशेष शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. तंटामुक्त
गावांना 46 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘शांततेतून समृद्धीकडे’ असे ब्रीद घेऊन 2क्क्7 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत आतार्पयत राज्यात 17 हजार 665 गावे तंटामुक्त झाली आहेत.
2क्12-13 या मोहिमेच्या सहाव्या वर्षात राज्यातील 1741 गावे तंटामुक्त झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक 246 गावे बुलडाणा जिलतील आहेत. त्या खालोखाल मराठवाडय़ातील हिंगोली जिलतील 148 गावे तंटामुक्त झाली आहे. यवतमाळ जिलत 129, अमरावती (ग्रामीण) 96, अकोला 49, वाशिम 34, नागपूर (ग्रामीण) 9क्, भंडारा 13, चंद्रपूर 1क्5, गडचिरोली 41, वर्धा 6, परभणी 45, नांदेड 1, उस्मानाबाद 29, बीड 9, जालना 85, औरंगाबाद ग्रामीण 64, सोलापूर ग्रामीण 56, सांगली 1, सातारा 15, पुणो ग्रामीण 26, कोल्हापूर 53, नंदूरबार 15, धुळे 32, जळगाव 71, अहमदनगर 47, सिंधुदूर्ग 21, रत्नागिरी 13, रायगड 8 आणि ठाणो ग्रामीणमधील 59 गावांचा सामवेश आह़े
च्महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कारातंर्गत राज्यातील 47 गावांची निवड विशेष शांतता पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यातील सर्वाधिक दहा गावे बुलडाणा जिलतील आहे.
च्त्या खालोखाल सोलापूर आठ, कोल्हापूर सात, चंद्रपूर सात, यवतमाळ एक, नागपूर ग्रामीण एक, परभणी एक, अहमदनगर तीन, सातारा दोन, जालना एक, उस्मानाबाद दोन गावांचा समावेश आहे.
च्या सर्व गावांना लोकसंख्येच्या प्रमाणो पुरस्काराच्या 25 टक्के रक्कम अतिरिक्त मिळणार आहे.