स्वरोत्सवास आजपासून सुरुवात
By Admin | Updated: December 11, 2014 00:43 IST2014-12-11T00:43:02+5:302014-12-11T00:43:02+5:30
सूर, लय, ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवास गुरुवारपासून रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर दिमाखात प्रारंभ होत आहे.

स्वरोत्सवास आजपासून सुरुवात
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : ज्येष्ठांसह युवक कलाकारांचा सहभाग
पुणो : सूर, लय, ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवास गुरुवारपासून रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर दिमाखात प्रारंभ होत आहे.
सलग चार दिवस रंगणा:या या स्वरोत्सवात तब्बल 25 कलाकारांच्या विभिन्न आविष्कारांची सुरेल पर्वणी रसिकांना मिळणार असल्याने राज्यासह देशविदेशातील दर्दी रसिकांमध्ये महोत्सवाविषयी उत्सुकता आहे. महोत्सवामधून शास्त्रीय संगीताविषयी होत असलेल्या प्रसारामुळे युवा पिढीची पावलेही गेल्या काही वर्षापासून महोत्सवाकडे वळू लागली आहेत, त्यामुळे महाविद्यालयाच्या कट्टय़ावर महोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ची चर्चा आहे.
यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या सांगीतिक मेजवानीसाठी अवघी ‘सांस्कृतिक’ नगरी सज्ज झाली आहे. आयोजकांकडून महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, रसिकांना स्वरोत्सवाचा निर्मळ आनंद विनाव्यत्यय घेता यावा यासाठी महोत्सवाच्या व्यवस्थेमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. भारतीय बैठकीची उंची थोडी वाढविण्यात आली असून, 8क् फुटांवरूनही कलाविष्कारांची अनुभूती रसिकांना मिळावी यासाठी यंदा दर वर्षी उभ्या करण्यात येणा:या 27 खांबाऐवजी केवळ 11 खांब उभे करण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठ 32 बाय 24चे असून, 6 एलईडी स्क्रिन लावण्यात आले असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून देण्यात आली.
महोत्सवाला दुपारी 3.3क् वाजता प्रसिद्ध सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने होणार आहे. महोत्सवादरम्यान दिग्गज कलाकार आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे कलावंत अशा 5क् कुटुंबांतील कलाकारांचे ‘विरासत’ हे छायाचित्र प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असेल. (प्रतिनिधी)
आज महोत्सवात
भीमण्णा जाधव (सुंद्रीवादन)
अश्विनी भिडे-देशपांडे (गायन)
सानिया पाटणकर (गायन)
दिवाकर-प्रभाकर कश्यप (गायन)
पं. शिवकुमार शर्मा (संतूरवादन)
पं. जसराज (गायन)