गणपतीबाप्पांसाठीचे रेल्वे रिझर्व्हेशन १२० दिवस आधी सुरू
By Admin | Updated: May 14, 2015 02:03 IST2015-05-14T02:03:47+5:302015-05-14T02:03:47+5:30
गणेशोत्सवासाठीचे रिझर्व्हेशन १२० दिवस आधी करण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे गणपती बाप्पा यंदा चाकरमान्यांना पावला आहे.
_ns.jpg)
गणपतीबाप्पांसाठीचे रेल्वे रिझर्व्हेशन १२० दिवस आधी सुरू
ठाणे : गणेशोत्सवासाठीचे रिझर्व्हेशन १२० दिवस आधी करण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे गणपती बाप्पा यंदा चाकरमान्यांना पावला आहे. आता गरज आज ती गणेशभक्तांनी जागरूकता दाखवून या योजनेचा फायदा घेण्याची. त्यामुळे ‘गाववाल्यानू गावाक जाऊचा असा त रिझर्व्हेशान बिगी बिगी करुचो’ असे कोकणवासी म्हणू लागले आहेत.
कोकणवासियांचा सगळ््यात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणात जाण्याचे मुख्य साधन रेल्वेच.परंतु, क्षमता छोटी आणि जाणारे प्रचंड यामुळे नेहमीच भक्तांची गैरसोय होते. त्यामुळे आरक्षण चार महिने आधी करू दिले जावे म्हणजे धावपळ होणार नाही व प्रतीक्षायादी पाहून ऐनवेळी नवीन गाड्या सोडणे अथवा गाड्यांचे डबे वाढविणे हे शक्य होईल.
हे लक्षात घेऊन या आरक्षणासाठी रेल्वेने यंदा चार महिने आधीची मुदत दिली आहे. त्यानुसार खालील वेळापत्रकानुसार आता आरक्षण करता येईल. (विशेष प्रतिनिधी)