धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

By Admin | Updated: July 23, 2015 01:15 IST2015-07-23T01:15:48+5:302015-07-23T01:15:48+5:30

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खंडाळा बोरघाटामध्ये धोकादायक झालेल्या दरडी तसेच सुटे दगड काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली.

Start working on the removal of dangerous stones | धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

अमोल पाटील , खालापूर
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खंडाळा बोरघाटामध्ये धोकादायक झालेल्या दरडी तसेच सुटे दगड काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. दरड कोसळण्याच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर स्पायडर केबल नेटचे जाळे पसरविले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व उपक्र म मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
खंडाळा बोरघाटामध्ये उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या स्विस कंपनीच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले असून, एकूण ८ धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी दगड तसेच डोंगरांचे धोकादायक भाग पाडण्यात येणार आहेत. तसेच मोठ्यात मोठे दगड मार्गावर येण्यापासून रोखण्यासाठी स्पायडर केबल नेटसारखी अत्यंत मजबूत जाळी संपूर्ण मार्गाच्या कडेने डोंगरावर लावण्यात येणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गुरु वारपासून जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात येणार असून कोणत्या ठिकाणी जाळी आवश्यक आहे, या काळात वाहतुकीचे नियोजन कसे करता येईल, याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले, पुणे व रायगड जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, एमएसआरडीसी तसेच आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Start working on the removal of dangerous stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.