कोणत्याही क्षणी टोल सुरू
By Admin | Updated: May 26, 2014 02:44 IST2014-05-26T02:44:44+5:302014-05-26T02:44:44+5:30
शहरात कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. टोलसाठी आवश्यक संरक्षण देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे

कोणत्याही क्षणी टोल सुरू
कोल्हापूर : शहरात कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. टोलसाठी आवश्यक संरक्षण देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आयआरबीने मागणी करताच संरक्षण दिले जाणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर आयआरबीने टोलवसुलीची तयारी सुरू केली. सुरुवातीस पोलीस प्रशासनास बंदोबस्त पुरविण्यासाठी पत्रव्यवहार केला. प्रथम लोकसभा निवडणूक व त्यानंतर नाक्यांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पायाभूत सुविधा पुरविण्यावरून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शविली. आयआरबीने पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे सुविधा पुरविण्याची तयारी पूर्ण केली आहे. आयआरबीने कोणत्याही परिस्थितीत पाऊस सुरू होण्यापूर्वी टोल सुरू करण्याची तयारी केली आहे. न्यायालयाचा कौल बाजूने लागल्याने टोलवसुली सुरू करण्यात येईल. यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. (प्रतिनिधी)