शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

विद्यार्थ्यांसाठी APAAR ID योजना राबविण्यास सुरुवात; आयुष्यभर उपयोगी ठरणार..., फायदा काय

By हेमंत बावकर | Updated: December 2, 2024 12:26 IST

APAAR ID scheme in Marathi: अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तसेच नोकरीवेळी देखील होणार आहे. 

- हेमंत बावकर

विद्यार्थ्यांच्या व कंपन्यांच्या सोईसाठी केंद्र सरकारने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये या योजनेचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवातही झाली आहे. या आयडीवर विद्यार्थ्यांचे सर्व मार्कशीटसह इतर शैक्षणिक डॉक्युमेंट ठेवले जाणार आहेत. जे हरवले तर किंवा नोकरीवेळी पडताळणीसाठी कंपन्यांच्या उपयोगी येणार आहे. 

अपार आयडी (APAAR ID) म्हणजेच ऑटोमॅटीक पर्मनंट एकेडमिक अकाऊंट रजिस्टर आयडी असे याचे नाव असणार आहे. डिजीलॉकर सारखेच हे अकाऊंट काम करणार आहे. या अकाऊंटमध्ये पहिलीपासून ते बारावीपर्यंतची सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केली जाणार आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तसेच नोकरीवेळी देखील होणार आहे. 

या अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. पालकांचे व मुलाचे आधार कार्ड, पॅन किंवा मतदान ओळखपत्राचा वापर यासाठी केला जाणार आहे. apaar.education.gov.in या वेबसाईटवर याचे रजिस्ट्रेशन होणार आहे. 

एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होताना, एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील शाळेत जाताना किंवा मार्कशीट हरवले तर याचा वापर करता येणार आहे. ही माहिती शिक्षणसंस्था, नोकरी देणाऱ्या संस्थांसोबत शेअर केली जाणार आहे. यासाठी पालकांची परवानगी आताच घेतली जाणार आहे. तसेच ही परवानगी केव्हाही काढून घेण्याची सोयही यात असणार आहे. परंतू, पालकांनी परवानगी नाकरण्यापूर्वी ज्या संस्थांना माहिती गेली आहे ती कायम राहणार आहे. 

फायदा काय...मार्कशीट, प्रमाणपत्र हरवल्यास अनेकदा शाळांचे, बोर्डाचे खेटे घालावे लागतात. ते वाचणार आहेत. नोकरीतील फ्रॉड वाचणार आहे. खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी बळकावल्याने अनेक होतकरू उमेदवार नोकरी पासून वंचित राहत होते. ते वाचणार आहे. APAAR ID द्वारे नोकरी देणारी कंपनी उमेदवाराचे एका क्लिकवर कागदपत्र पडताळणी करू शकणार आहेत.  

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा