कास पठारावर फुलांच्या बहराला प्रारंभ !

By Admin | Updated: August 1, 2016 18:11 IST2016-08-01T18:11:08+5:302016-08-01T18:11:08+5:30

सातारा शहराच्या पश्चिमेस असणारे व जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना

Start the flowering debris on the Kas plateau! | कास पठारावर फुलांच्या बहराला प्रारंभ !

कास पठारावर फुलांच्या बहराला प्रारंभ !

ऑनलाइन लोकमत

पेट्री ( सातारा ), दि. १ - सातारा शहराच्या पश्चिमेस असणारे व जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच परराज्यातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. पठारावरील मनाला मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची सतत गर्दी होत असते.
या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशा निळ्या, जांभळ्या, लाल, पांढऱ्या रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात.
या पठारावरील सुंदर अशा विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. या काळात कास पठाराचे रूप सतत बदलत असते. सध्या पांढऱ्या रंगांची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाळा ऋतूचा आनंद घेत या मनमोहक सुंदर अशा फुलांना आपल्या कॅमे-यात टिपताना दिसत आहेत. शनिवार, रविवारी पर्यटक, महाविद्यालयीन तरुणाईची मोठ्या प्रमाणावर कास पठारावर गर्दी होऊ लागली आहे. 

सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गात कास पठार येथे जून ते आॅक्टोबर महिन्यात विविध रंगांची फुले फुलण्यास सुरुवात होते. रंगबिरंगी फुलांचे गालिचे मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाहावयास मिळतात. यामध्ये झाडांवरील आर्किड, गजरा, अमरी, गुलाब दानी, जमिनीवरील आर्किड, भूईचक्र, आर्किड तसेच इतर लहान वनस्पती, झाडे येतात. सध्या पांढ-या फुलांनी पठार बहरण्यास सुरुवात झाली आहे.


आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर काही ठिकाणी दुर्मीळ वनस्पती आलेल्या दिसत असून, या पठार परिसरात फिरावयास येणाऱ्या पर्यटकांनी ही फुले पाहताना आपल्या पायदळी तुडवली जाऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- गणेश मोहिते, पर्यटक (मुंबई)

 

Web Title: Start the flowering debris on the Kas plateau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.