जेईई मेन्स परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ
By Admin | Updated: November 24, 2014 03:15 IST2014-11-24T03:15:04+5:302014-11-24T03:15:04+5:30
देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणा-या जेईई मेन्स परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ

जेईई मेन्स परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ
मुंबई : देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणा-या जेईई मेन्स परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. जेईई
मेन्सची पेपर अॅण्ड पेन बेस परीक्षा ४ एप्रिल, तर कॉम्प्युटर बेस परीक्षा १0 आणि ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २0१५-१६ करिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई मेन्सच्या आधारे करण्यात येणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी जेईई मेनची पेन अॅण्ड पेपर बेस्ड परीक्षा ४ एप्रिल आणि १0 ते ११ एप्रिल रोजी कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची माहिती ६६६.्नीीें्रल्ल.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. (प्रतिनिधी)