फलक हटविण्यास सुरुवात
By Admin | Updated: July 23, 2016 04:47 IST2016-07-23T04:47:23+5:302016-07-23T04:47:23+5:30
वाढदिवासानिमित्त पूर्व उपनगरात खड्डे खणून बॅनर लावण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हे बॅनर हटविण्यास सुरुवात झाली

फलक हटविण्यास सुरुवात
मुंबई : सेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या वाढदिवासानिमित्त पूर्व उपनगरात खड्डे खणून बॅनर लावण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हे बॅनर हटविण्यास सुरुवात झाली. मात्र पालिका प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेन.
आमदार सुनील राऊत यांचा वाढदिवस २० जुलै रोजी साजरा झाला. वाढदिवसाच्या दोन दिवस आधीपासून पूर्व उपनगरांतील चौकाचौकात त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर उभे करण्यासाठी रस्त्यावर दोन खड्डे खणून त्यात बांबू रोवण्यात आले. या बॅनरबाबत शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच हटविण्यात आल्याचे दिसले. सकाळपासून पूर्व उपनगरांसह मुंबईत याबाबत वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला होता. (प्रतिनिधी)