स्टार प्रचारकांमध्ये आशिष शेलार, किरीट सोमय्यांना नाही मिळाले स्थान

By Admin | Updated: February 11, 2017 12:10 IST2017-02-11T12:10:05+5:302017-02-11T12:10:05+5:30

भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून, या यादीत दोन नावे नसल्याने भाजपामध्येच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Star campaigners Ashish Shelar and Kirit Somaiya did not get the place | स्टार प्रचारकांमध्ये आशिष शेलार, किरीट सोमय्यांना नाही मिळाले स्थान

स्टार प्रचारकांमध्ये आशिष शेलार, किरीट सोमय्यांना नाही मिळाले स्थान

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून, या यादीत दोन नावे नसल्याने भाजपामध्येच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवसेनेविरोधात जोरदार आघाडी उघडणारे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमय्या यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश केलेला नाही. 
 
40 जणांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इरानी, शिक्षण मंत्री विनोद तावडे, राम शिंदे, चंद्रकांत पाटील, खासदार पूनम महाजन यांचा समावेश आहे. मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये हे नेते प्रचार करणार आहेत. 
 
योग्य संवाद आणि समन्वयाअभावी आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्या नावाचा समावेश करायचा राहून गेला असेल. आशिष शेलार मुंबई अध्यक्ष आहेत त्यांचे नाव वगळता येणार नाही. शेलार आणि सोमय्या दोघे शिवसेने विरोधातील आमची मुख्य तोप आहेत असे वरिष्ठ भाजपा पदाधिका-याने सांगितले. दोघांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर व्यक्तीगत टीका केली आहे. सोमय्या यांनी तर, उद्धव ठाकरेंना संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन दिले आहे. 
 
 
 

Web Title: Star campaigners Ashish Shelar and Kirit Somaiya did not get the place