आयएमएसाठी सतत कार्य करणाऱ्या ३३ डॉक्टरांना स्टार अवार्ड
By Admin | Updated: August 20, 2016 23:55 IST2016-08-20T23:55:07+5:302016-08-20T23:55:54+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनस शनिवारी शहरात प्रारंभ झाला. आयएमएसाठी सतत कार्य करणाऱ्या डॉक्टरांसह सामाजिक

आयएमएसाठी सतत कार्य करणाऱ्या ३३ डॉक्टरांना स्टार अवार्ड
आयएमए’च्या राज्यस्तरीय बैठकीस प्रारंभ : डॉक्टरांवरील हल्ले व तोडफोडबाबत चर्चा
जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनस शनिवारी शहरात प्रारंभ झाला. आयएमएसाठी सतत कार्य करणाऱ्या डॉक्टरांसह सामाजिक योगदान देणाऱ्या राज्यभरातील डॉक्टरांचा आयएमए स्टार अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला.
२० आॅगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता अजिंठा रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे या अधिवेशनास सुरुवात झाली. यामध्ये प्रथम ग्राहक मंच प्रतिनिधींसोबत बैठक, आयएमएच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याममध्ये डॉक्टरांवरील हल्ले, दवाखान्याची तोडफोड यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
त्यानंतर स्नेहसंमेलन होऊन सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये डॉक्टरांसह जळगावात झालेल्या महाआरोग्य शिबिरात कार्य करणाऱ्या जी.एम. फाउंडेशनच्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले, सचिव पार्थिव संघवी, पुढील वर्षाचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर, डॉ. देवकुमार उत्पुरे, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या अधिवेशनासाठी ३०० डॉक्टर उपस्थित आहे.
आयएमए स्टार अवार्ड प्राप्त डॉक्टर
- आयएमएसाठी सतत कार्य करणारे : डॉ. अर्जुन भंगाळे (अध्यक्ष, आयएमए शहर), डॉ. विलास भोळे (सहसचिव), डॉ. प्रताप जाधव, डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. उदयसिंग पाटील, डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. भरत बोरोले, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र चौधरी, डॉ. नितीन धांडे, डॉ. किरण भिरुड, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. राजेश कोलते, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. सुनील गाजरे, डॉ. मनिषा दमाणी, डॉ. धीरज चौधरी, डॉ. नितीन खडसे, डॉ. किरण पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. अजय शास्त्री, डॉ. सी.जी. चौधरी, डॉ. उल्हास बेंडाळे, डॉ. नितीन भारंबे, डॉ. तुषार बोरोले,
- सामाजिक कार्य : डॉ. राजेश पाटील, डॉ. वर्षा वारके, डॉ. धमेंद्र पाटील, डॉ. अनिल खडके, डॉ. राजेंद्र भालोदे, डॉ. अमित राजपूत, डॉ. वृषाली पाटील.
जी.एम. फाउंडेशनचे सत्कारार्थी सदस्य
रामेश्वर नाईक, डॉ. आनंद जैन, अरविंद देशमुख, अमित देशमुख, मुरलीधर पाटील, पितांबर भावसार, डॉ. चेतन पाटील.
आज अधिवेशनात...
२१ आॅगस्ट सकाळी बोगस डॉक्टर, क्रॉस पॅथी, डीएमएलटी, पीसीपीएनडीटी, आयुर्वेद रजिस्ट्रार इत्यादी विषयावर १३४ आयएमए शाखांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. त्यानंतर अधिवेशनचा समारोप होणार आहे.