सट्टाबाजाराचा अड्डा उद्ध्वस्त; ६ अटकेत

By Admin | Updated: May 16, 2015 02:51 IST2015-05-16T02:51:44+5:302015-05-16T02:51:44+5:30

आयपीएलच्या सामन्यांवर शहरात सुरू असलेला सट्टेबाजाराचा मोठा ‘हायटेक’ अड्डा गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केला.

The stampede's base destroyed; 6 arrest | सट्टाबाजाराचा अड्डा उद्ध्वस्त; ६ अटकेत

सट्टाबाजाराचा अड्डा उद्ध्वस्त; ६ अटकेत

औरंगाबाद : आयपीएलच्या सामन्यांवर शहरात सुरू असलेला सट्टेबाजाराचा मोठा ‘हायटेक’ अड्डा गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केला. सट्टाबाजार चालकासह शहरातील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शहरातील उच्चभ्रूंचाही समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २२९ मोबाइल, ३६५ चार्जर, सुमारे ६ लाखांची रोकड व इतर साहित्य असा ५० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मुख्य आरोपी नरेश धर्माजी पोतलवाड (३५, उस्मानपुरा), उद्योजक विनय नवीनचंद जैन (४९, सिडको), बिल्डर अनिल पोपटलाल मुनोत (५०, जिजामाता कॉलनी), मार्बलचे व्यापारी ललित हस्तिमल कोठारी (४९, सिडको), प्रफुल्ल अंबीरचंद राठी (४८, सुराणानगर) आणि ठेकेदार अलोक अशोक अग्रवाल (३०, सिडको) यांचा अटक केलेल्यांत समावेश आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर शहरात बुकी सट्टा घेत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला खबऱ्याकडून १० दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर संशयितांवर, त्यांच्या मोबाइल कॉलवर नजर ठेवण्यात आली. अखेर उस्मानपुऱ्यातील रामगोविंद अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ५मध्ये राहणाऱ्या नरेश पोतलवाडच्या घरातून हा सगळा व्यवहार चालत असल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. आरोपी अलिशान रूममध्ये मोठ्या टीव्ही स्क्रीनवर आयपीएलची मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाताची मॅच पाहत सट्ट्याचे दिल्लीहून भाव घेऊन ते बुकींपर्यंत पोहोचविताना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागला. नरेश २८ बुकींसोबत मोबाइलवर सट्टा घेत होता. पोलिसांनी ते २८ मोबाइल क्रमांक कुणाचे आहेत आणि त्यांचे लोकेशन मिळविले. तेव्हा त्यापैकी सहा बुकी शहरातील असल्याचे स्पष्ट होताच मोबाइल लोकेशनच्या आधारे गुन्हे शाखा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अलोक अग्रवाल, प्रफुल्ल राठी, ललित कोठारी, अनिल मुनोत व विनय जैन यांना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: The stampede's base destroyed; 6 arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.