शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:04 IST

राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे.

मुंबई : राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा प्रस्ताव कामगारांनी अमान्य केला, तर संघटनांनी सुचविलेली पगारवाढ देणे शक्य नाही, असे सरकारने सांगितले. रावते यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ न त्यांना बुधवारच्या चर्चेची माहिती दिली. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामगार प्रतिनिधींना वाटाघाटींसाठी बोलावलेच नाही. संप मागे घेतला तरच सरकार पुढील बोलणी करेल, असा पवित्रा रावते यांनी घेतल्याने कामगार संतप्त आहेत.एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीबाबत चांगला प्रस्ताव आम्ही दिला आहे. संबंधित संघटना स्थापन झाल्यापासूनची ७७ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. यापेक्षा अधिक वेतनवाढ देणे एसटी प्रशासनास अशक्य आहे. त्यामुळे आता संप मागे घ्यावा.- दिवाकर रावते,एसटी अध्यक्ष व परिवहनमंत्रीयोग्य विचार व्हावासध्या ११०० कोटींचा प्रस्ताव महामंडळाने आमच्या समोर ठेवला आहे. वेतनवाढीच्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना कर्मचाºयांना अपेक्षित लाभ मिळणार नाही. आमची मागणी कर्मचाºयांसाठी २२०० कोटींची आहे. राज्यात शेतकºयांसाठी ३६ हजार कोटींची कर्जमाफी होऊ शकते. तर आम्हा कर्मचाºयांच्या मागणीचाही योग्य विचार व्हावा, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.- संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना...तर कुटुंबीयांसह जेल भरो आंदोलनप्रशासन संप फोडून काढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे संप चिघळू शकतो. सरकारने वेळीच गंभीर व्हावे, अन्यथा कर्मचारी कुटुंबीयांसह जेल भरो आंदोलन करतील. - मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र