क्रेडिट कार्डद्वारेही भरता येणार मुद्रांक शुल्क
By Admin | Updated: September 30, 2015 00:55 IST2015-09-30T00:55:22+5:302015-09-30T00:55:22+5:30
दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने आॅनलाईन दस्तनोंदणी सुरू केली. यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड

क्रेडिट कार्डद्वारेही भरता येणार मुद्रांक शुल्क
पुणे : दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने आॅनलाईन दस्तनोंदणी सुरू केली. यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड वा कॅश कार्डद्वारेदेखील दस्तनोंदणीचे मुद्रांक शुल्क भरता येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात ही सुविधा सुरू होईल, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने विविध सेवांची प्रक्रिया, त्यासाठी लागणारे शुल्क, कायदेशीर तरतुदी आदी माहिती आॅनलाईन सेवेद्वारे उपलब्ध करून
दिल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दस्तनोंदणीच्या प्रचलित पद्धतीत मुद्रांक, मुद्रांक कागद,
फ्रँकिंग, चलन, ई-स्टॅम्पिंग याशिवाय नोंदणी फीच्या बाबतीत धनाकर्ष, चलन आणि रोख रक्कम असे शंका घेण्यास वाव देणारे बरेच टप्पे होते. याला वेळ तर प्रचंड लागत होताच; शिवाय कागद व छपाईचा खर्चही प्रचंड होतो. नव्या पद्धतीत ई-पेमेंट ही एकमेव प्रक्रिया आहे. कमी वेळात दस्तनोंदणी पूर्ण होऊन खर्चात काटकसर करण्याचा हेतू आहे. (प्रतिनिधी)
----------
मुद्रांक शुल्क विभागात विविध कागदपत्रांसाठी अंतर्गत चलन भरावे लागते. त्याचे शुल्क रोख द्यावे लागते. ते रोख न देता आॅनलाईन जमा करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग प्रयत्नशील आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे अंतर्गत चलन बंद करून त्याचेही पैसे आॅनलाईन जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती एन. रामास्वामी यांनी दिली.