शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

By दीपक भातुसे | Updated: June 12, 2024 07:24 IST

Teacher Recruitment: राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच शासनाला खडबडून जाग आली असून आचारसंहिता असतानाही शिक्षक भरती करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.  या बातमीनंतर तीन दिवसांतच शिक्षण विभागाने शिक्षक भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

- दीपक भातुसे मुंबई - राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच शासनाला खडबडून जाग आली असून आचारसंहिता असतानाही शिक्षक भरती करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.  या बातमीनंतर तीन दिवसांतच शिक्षण विभागाने शिक्षक भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

या बातमीची दखल घेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ११ जून रोजी प्रसिद्धीपत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे. पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.

२५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच, घोषणा २१,६७८ जागांची, भरल्या फक्त ११,०८५’ या मथळ्याखाली ८ जून रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करून रखडलेल्या शिक्षक भरतीकडे शासनाचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने शिक्षणमंत्र्यांनाही संपर्क केला होता.

समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी    - समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रुपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. - समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार