स्थैर्य गरजेचे आहे
By Admin | Updated: November 13, 2014 01:21 IST2014-11-13T01:21:23+5:302014-11-13T01:21:23+5:30
अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे.
स्थैर्य गरजेचे आहे
अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे. त्यात भाजपाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. शिवाय छोटय़ा पक्षांनी त्यांना दिलेला पाठींबा त्यामुळे ते बहुमताच्या जवळ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येतील हे कदापि शक्य नाही आणि आज राज्यात पुन्हा निवडणुका कोणालाही नको आहेत. जनतेला देखील त्या न परवडणा:या आहेत. सरकारला स्थैर्य नसेल तर प्रशासनावरची पकड ढिली होते व त्यात राज्याची हानी होते म्हणून राष्ट्रवादीने सरकारला पाठींबा देऊ केला आहे.
जर आम्ही सरकार बनवू शकत नसू तर राज्यात सरकारच नाही असे चित्र ठेवणो देखील हिताचे नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पाठींबा दिला असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आजच्या काळात माध्यमं प्रभावी आणि न्यायालये आक्रमक बनलेली असताना असा विचारच चुकीचा आहे. जयललिता यांना मुख्यमंत्री असतानाही शिक्षा झालीच ना. या सरकारने चांगले निर्णय घेतले तर राज्यावर स्थैर्यावर परिणाम होणार नाही. राज्यात बहुमताची सरकारे अपयशी ठरल्याची आणि अल्पमतातली सरकारे यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणो आहेत. जर या सरकारने वीज, बेकारी, शेती असे अनेक प्रश्न आहेत. अशावेळी सुडबुध्दीने न वागता चांगले काम केले तर अल्पमतातले सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकेल. हे करत असताना राज्याचा भावनिक नकाशा बिघडू देऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन विदर्भाच्या विरोधात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात बोलणो योग्य नाही. राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, राज्याच्या वाटय़ाचे पाणी अन्य राज्यात जाऊ न देण्यासाठी निर्णय घेणो असेल किंवा मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याचे निर्णय असतील, सरकार चांगले काम करणार असेल तर नक्कीच टिकेल.
(लेखक माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते आहेत)