शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळणार; चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर झाले हजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 09:00 IST

ST Workers Strike : दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे काल चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले होते. 

दापोली :  राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील एका चालकाची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे काल चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले होते. 

चालक अशोक वनवे हे मुळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहेत. सध्या कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे, मात्र आता चालकाने बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाल्यामुळे दापोलीत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. काल आज दुपारी 3 वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर चालक अशोक वनवे यांची ड्युटी होती शिवशाही बस प्रवाशांसह घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले, मात्र हा प्रकार दापोली बस स्थानकात चर्चेचा विषय ठरला .

काय म्हणाले अशोक वनवे?माझ्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा, असे सांगितले. कामावर न आल्यास मेमो मिळेल अशी भीती होती. आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या 13 हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे? हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे चालक अशोक वनवे यांनी सांगितले. तसेच,  आमच्या मागण्यांना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजून घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असेही चालक अशोक वनवे म्हणाले. 

17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठकगेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.  सध्या 250 बस आगार पैकी 160 बस डेपो बंद आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची आज महत्वाची बैठक होणार आहे. याशिवाय, एसटीचा प्रश्न आता न्यायालय गेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र