शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:51 IST

Pratap Sarnaik News: उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जागेवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले  रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई - उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जागेवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले  रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात याबाबत बोलावलेल्या बैठकीत बोलताना प्रताम सरनाईक यांनी ही माहिती दिली.  या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुला वर अवलंबून राहणे श्रेयस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्या कडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या  २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात , पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात  सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल आणि सीएनजी  या पारंपरिक इंधन विक्री बरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले पंप उभा करणे प्रस्तावित आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, असे  समुच्चय इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यावसायीक दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत,  त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, अशा २५० पेक्षा जास्त जागेवर  ४० बाय ३०  मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत.  या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक-खाजगी भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बरोबर देशातील नव्हे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एस टी महामंडळाच्या सुमारे २५० पेक्षा जास्त जागांवर व्यवसायिक तत्वावर समुच्चय इंधन विक्री केंद्र उभा करण्यासाठी निमंत्रित करीत आहोत. जिथे एस टी महामंडळाला स्वतःच्या बसेस साठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील  किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल.अशा पद्धतीचे ' पेट्रो -मोटेल हब " उभा करण्याचा मानस आहे.

"भविष्यात व्यावसायीक इंधन विक्रीतुन सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळाला  देखील उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल!" - प्रताप सरनाईक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra ST to Sell Fuel, Boost Income: Tender Process Starts

Web Summary : Maharashtra State Transport (ST) will start retail fuel sales at over 250 locations to boost income. This includes petrol, diesel, CNG, and electric charging points. The tender process has commenced, aiming for public-private partnerships to generate revenue for the corporation.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटीPetrol Pumpपेट्रोल पंप