शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

ग्रामीण भागासाठी एसटीची लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:31 IST

प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्ययावत व स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार

मीरा रोड : एसटी महामंडळ ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक बस सुरू करणार असून त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोस्टल मार्ग हा वाढवण बंदरापर्यंत विस्तारित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री झाल्यावर मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाद्वारे मीरा रोड भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासह सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत, पाणीपुरवठ्यात वाढ करावी, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत, दहिसर टोल नाका येथील कोंडी दूर करावी, अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी, भाईंदरमधून सुटणाऱ्या एसटी बसची संख्या वाढवावी, आदी मुद्दे उपस्थित केले.

टोल नाका हटवून केवळ अवजड वाहनांसाठी दोन टोल मार्गिका ठेवण्यात येतील. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासकामांसाठी सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो व रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली जातील, जेणेकरून वाहतूककोंडी सुटेल, असेही ते म्हणाले.

इंधन बचत व प्रदूषण नियंत्रण!

राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातसुद्धा इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार असून यामुळे इंधन खर्चात व देखभाल-दुरुस्तीमध्ये बचत होईल आणि प्रदूषण टळेल. 

यासह प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्ययावत व स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. रात्रपाळी करणाऱ्या एसटी चालक, वाहक आदींसाठी झोपण्याची आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही कामे आपण प्राधान्याने हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpratap sarnaikप्रताप सरनाईक