एसटीचे तिकीट आरक्षणही मोबाईल अॅपवर
By Admin | Updated: July 19, 2016 19:53 IST2016-07-19T19:47:27+5:302016-07-19T19:53:34+5:30
खासगी प्रवासी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी कात टाकत असलेल्या राज्य मार्ग परिवाहन महामंडळ (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरली असली असून आता सर्वसामान्यांच्या

एसटीचे तिकीट आरक्षणही मोबाईल अॅपवर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.19 - खासगी प्रवासी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी कात टाकत असलेल्या राज्य मार्ग परिवाहन महामंडळ (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरली असली असून आता सर्वसामान्यांच्या प्रवासाची जीवनवाहीनी असलेले एसटीचे तिकिट बुकिंग आता मोबाईल अॅपवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली असून या अॅपद्वारे प्रवाशांना आॅनलाईन पेमेंटही करता येणार आहे. MSRTC mobie reservation app या नावाने हे मोबाईल अॅप्लीकेशन असणार आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी आणि एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी एसटी महामंडळाने मोबाईल अॅपची निमीर्ती केली आहे.
महामंडळाकडून १७ जुन पासून सर्वांसाठी हे नवीन अॅप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. ते मोबाईल मध्ये डाऊललोड केल्यानंतर प्रवाशाने नोंदणी करुन लॉगिन करणे गरेजेचे आहे. प्रवाशांला कोठे जायचे आहे, कोणत्या गाडीने जायचे आहे, कोणत्या ठिकाणाहून गाडीमध्ये बसायचे आहे तसेच कोणत्या ठिकाणावर उतरायचे आहे, हे सर्व पर्याय या अॅपवर उपलब्ध होणारत आहेत. सोयीचा आसन क्रमांक, बस सेवेचा प्रवार, बस पेष्ठरीची वेळही प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येणार आहे. दरम्यान, आॅनलाई पेमेन्टची सुविधा हे आॅपचे वैशिष्टे आहे. तिकिटाच्या आरक्षणासाठी नेट बँकींग , क्रडीट, डेबिट कार्डद्वारे पेमेन्ट करण्याची सुविधा या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे अॅप्लीकेशन सर्व प्रकारच्या अँन्ड्रॉईड मोबाईलवर वापरता येणार आहे.
खासगी प्रवासी वाहनांच्या बुकिंगसाठी गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल अँप्लीकेशन उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सेवेकडे अधिक कल होता. त्यातच खासगी प्रवासी बसही अत्याधुनिक स्वरूपाच्या असल्याने एसटीकडे प्रवाशांचे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र होते.मात्र, आता खासगी वाहतूकीला शह देण्यासाठी मोठया शहरांमध्ये अत्याधुनिक शिवनेरी बस, इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग आणि आता मोबाईल अँप्स द्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देऊन एसटीने कात टाकल असल्याची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे.