शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपर्यंत कामावर आल्यास निलंबन मागे, अन्यथा...; परिवहनमंत्री अनिल परबांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 07:12 IST

सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावे, निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावे. मला संधी दिली नाही असे वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत

मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर व्हावे. जे कर्मचारी निलंबित असतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल अन्यथा सोमवारनंतर कारवाई तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी दिला. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मागणीसाठी  हा संप  सुरू आहे. यासंदर्भात परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील आगारातील गाड्यांचा व कर्मचारी उपस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी  ते बोलत होते.

ॲड. परब म्हणाले की,  संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बाब म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जे कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत त्यांना सकारात्मक वातावरणामध्ये कामावर रुजू करून घेण्यासाठी निलंबनासारखी  कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संधीचा लाभ घेऊन निलंबित कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे. जेणेकरून संबंधितांना भविष्यात कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार नाही. संपामुळे ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थी आदींना नाहक त्रास होत आहे. त्यांना एसटीची सेवा मिळावी यासाठी आम्ही त्यांना बांधील आहोत, असे परब म्हणाले.

सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावे, निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावे. मला संधी दिली नाही असे वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत. अडवले गेले तर, कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावे, जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल. तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कामगार कामावर परतले नाहीत तर, त्याहून कठोर कारवाई केली जाईल. - अनिल परब, परिवहनमंत्री

‘न्यायालयीन प्रक्रियेबाबत संभ्रम दूर झाला पाहिजे’२० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत होणार सुनावणीदरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरणासंदर्भातील अंतिम अहवाल १२ आठवड्यांपर्यंत म्हणजेच सुमारे २० जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाला मुख्यमंत्र्यांद्वारे सादर करण्यात येणार आहे.  न्यायालयीन प्रक्रियेबाबत कर्मचा-यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला पाहिजे, असेही परिवहनमंत्री म्हणाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब