शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
2
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
3
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
4
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
5
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
6
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
7
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
8
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
9
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
10
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
11
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
12
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
13
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
14
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
15
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
16
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
17
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
18
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
19
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
20
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसस्थानकं आता चकाचक होणार! दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम अनिवार्य; राज्यभर स्वच्छतेचा नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:42 IST

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

MSRTC: राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न आता गंभीर झाला असून, खुद्द परिवहन विभागानेच आता कंबर कसली आहे. सोलापूर बसस्थानकातील भीषण अस्वच्छता पाहून संतापलेल्या परिवहन मंत्र्यांनी आगार प्रमुखाचे थेट निलंबन केले होते. या कारवाईनंतर आता राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी ' स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर आगार प्रमुखांवर झाली होती निलंबनाची कारवाई

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाची पाहणी केली होती. त्यावेळी स्थानकातील अस्वच्छता पाहून त्यांनी संताप व्यक्त केला होता आणि तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बस आगार हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे, असे खडेबोल त्यांनी सुनावले होते. मात्र, आठवडा उलटल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे पाहून सरनाईक यांनी थेट कारवाई केली. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आगार प्रमुखाला जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले. 

दर १५ दिवसांनी 'स्वच्छता मोहीम' सक्तीची

त्यानंतर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महामंडळाने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच आणि विशेषतः महिला विश्रांतीगृहे व शौचालयांची १५ दिवसातून एकदा पूर्णपणे स्वच्छता करावी लागेल. यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे.

"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उ‌द्देशाने हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती. काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.

"कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे," असंही निवेदनातून सांगण्यात आलं आहे.

प्रवाशांना मिळणार दिलासा

नव्या स्वच्छता मोहिमेमुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आता ही मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात बसस्थानकांचे रूप पालटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MSRTC bus stands to be sparkling clean with fortnightly drives!

Web Summary : MSRTC mandates fortnightly cleanliness drives across all bus stands after Solapur bus depot's appalling condition led to suspension. The initiative aims to provide hygienic facilities, focusing on restrooms, seating, and waste management with community involvement.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtraमहाराष्ट्र