एसटीने मार्ग तपासणी मोहीम केली कडक
By Admin | Updated: December 29, 2014 04:55 IST2014-12-29T04:55:27+5:302014-12-29T04:55:27+5:30
उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध उपाययोजना करीत आहे. त्याचदृष्टीने मार्ग तपासणी मोहीम अधिक तीव्र

एसटीने मार्ग तपासणी मोहीम केली कडक
गडचिरोली : उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध उपाययोजना करीत आहे. त्याचदृष्टीने मार्ग तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्यासाठी अतिरिक्त तपासणी पथके नेमलीे आहेत. याद्वारे ‘चिरीमिरी’ देऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच अशा वाहकांना देखील चाप लावण्याचा प्रयत्न महामंडळाचा आहे.
मुख्य मार्गांसह ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीत काही प्रवासी ‘नेहमीचे’ असतात. त्यामुळे गोळाबेरीज करून तिकिटापोटी एक विशिष्ट रक्कम देऊन ते प्रवास करतात. हे पैसे अनेकवेळा ड्युटीवरील हिशेबात काही वाहक दाखवत नाहीत. परिणामी बस प्रवाशांनी गच्च भरून धावत असतानाही तिचे उत्पन्न मात्र तितके दिसत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी मार्ग तपासणी मोहीम तीव्र करतानाच अतिरिक्त किमान १० पथके नेमण्याचे आदेश एसटीचे व्यवस्थापकीय संचालकांनी २० डिसेंबर रोजी प्रत्येक विभागीय कार्यालयांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून ही तपासणी आता आठवड्यातून तीन दिवस होणार आहे.