शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणपतीत एसटीचा चक्काजाम, कृती समितीसोबत मुख्यमंत्री आज करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:57 IST

ST Bus Employees Strike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाचे संपात रूपांतर झाल्याने बससेवेला मोठा फटका बसला.

मुंबई -  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाचे संपात रूपांतर झाल्याने बससेवेला मोठा फटका बसला. दिवसभरात ११,९४३ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे  हाल झाले.   

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच  वेतन. २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि   वार्षिक वेतनवाढीचा दर, ५८ महिन्यांची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी, या मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.  

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृती समितीबरोबर चर्चा करणार आहेत. ते योग्य निर्णय घेतील.  - उदय सामंत, उद्योगमंत्री

कुणाला त्रास देणे, हा आमचा उद्देश नाही. आमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. तोडगा निघेपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. - श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समिती

संपकरी कर्मचाऱ्यांवर एफआयआर - कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. - संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी बुधवारपासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्रGanesh Mahotsavगणेशोत्सवMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार