मराठी कवितांनी सजणार एसटी
By Admin | Updated: February 27, 2016 02:01 IST2016-02-27T02:01:31+5:302016-02-27T02:01:31+5:30
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेबु्रवारीला राज्यभरातील ५६८ बस स्थानके मराठी कवितांच्या ओळींनी सजणार आहेत. त्याचप्रमाणे १८,५00 बसवर या कविता लावण्यात येणार आहेत.

मराठी कवितांनी सजणार एसटी
अलिबाग : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेबु्रवारीला राज्यभरातील ५६८ बस स्थानके मराठी कवितांच्या ओळींनी सजणार आहेत. त्याचप्रमाणे १८,५00 बसवर या कविता लावण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातर्फे मराठी कवी-साहित्यिकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
राज्यभरातील एसटी स्थानकांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष
दिवाकर रावते यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे २० एसटी स्थानकांत कुसुमाग्रजांच्या कविता फलकाचे अनावरण प्रवासी जनता
व एसटी अधिकारी व कर्मचारी
यांच्या उपस्थितीत स्थानिक मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते होणार आहे. अशा प्रकारे राज्यात प्रथमच एसटी आगारांमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)