शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:39 IST

ST Bus Ticket Price Hike: या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.

परीक्षा संपल्या की, नागरिकांना गावी जाण्याचे वेध लागतात. एसटी महामंडळाची बस खेड्यापाड्यांमध्ये अगदी घरापर्यंत नागरिकांना पोहचवत असल्याने एसटी बसच सोयीस्कर ठरते. तसेच विविध सवलतींमुळे एसटीचा प्रवास किफायतशीर देखील ठरतो. मात्र, हंगामी भाडे वाढीमुळे एसटीचा प्रवास पुन्हा काही प्रमाणात महागणार आहे. 

गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ नागरिकांच्या रोषामुळे रद्द केली होती. दरम्यान आता पुन्हा भाडेवाढ मागे घेण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढवू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हंगामी भाडेवाढ

हंगामी भाडेवाढ ही साधी /मिडी, बसजलद (साधारण),  रात्रसेवा, या बस सेवेसाठी लागू राहणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार नव्या भाडेवाढीनुसार प्रवाशांना प्रति टप्पा भाडे किमान भाडे प्रौढ प्रवाशांसाठी १२ रुपये तर, लहान मुलांसाठी ७ रुपये असणार आहे.

असा महागणार प्रवास

बसचा प्रकार (प्रति टप्पा)    सध्या      उन्हाळी

  • साधी (मिडी,साधी)    १०.०५ पैसे    ११.०५पैसे
  • जलद    १०.५पैसे    ११.०५पैसे

एसटी बसचा मार्ग    सध्या    उन्हाळी

  • परळ-कोल्हापूर(साधी)    ६४०रु.    ७०४रु.
  • मुंबई-छत्रपती     ८००रु.    ९०० रु.
  • संभाजी नगर (साधी) 
  • मुंबई-सोलापूर(साधी)    ७५० रु.    ८२५ रु. 
  • मुंबई—-जालना( साधी)    ८००रु.    ९०० रु. 
  • मुंबई—लातूर(साधी)    ९०० रु.    १०००रु.
  • मुंबई-सांगली (साधी)    ७३० रु.    ८०३रु.
  • मुंबई- रत्नागिरी(साधी)    ६०० रु.    ७००रु.
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra ST Bus Fares Surge 10% for Summer Travel

Web Summary : Maharashtra State Transport (ST) Corporation increases bus fares by 10% from April 15 for summer. Long-distance travel will become more expensive, impacting passengers heading to villages during vacation. The fare hike applies to various bus services, increasing costs by ₹90-₹100.
टॅग्स :state transportएसटीticketतिकिटPrice Hikeदर वाढMaharashtraमहाराष्ट्रTravel Tipsट्रॅव्हल टिप्स