एसटीचे आता २४ तास कॉल सेंटर
By Admin | Updated: April 24, 2015 01:12 IST2015-04-24T01:12:18+5:302015-04-24T01:12:18+5:30
एसटीची झालेली दुरवस्था, आगारात सुविधांचा अभाव आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष पाहता आता एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी कंपन्यांप्रमाणेच स्वत:चे कॉल सेंटर

एसटीचे आता २४ तास कॉल सेंटर
सुशांत मोरे, मुंबई
एसटीची झालेली दुरवस्था, आगारात सुविधांचा अभाव आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष पाहता आता एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी कंपन्यांप्रमाणेच स्वत:चे कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हे कॉल सेंटर उभारले जाणार असून, सध्या सुरू असलेली हेल्पलाइन त्यामध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १७ हजार गाड्या असून, वर्षाला जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. एसटी महामंडळाने आपल्या हेल्पलाइनमध्ये बदल करून नवे कॉल सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटी महामंडळाची १८00२२१२५0 ही टोल फ्री हेल्पलाइन असून, ही सेवासुद्धा २४ तास उपलब्ध आहे. यासाठी पाच ते सहा कर्मचारी काम करतात. एसटी मुख्यालयात हेल्पलाइनचा पसारा एका रूममध्ये थाटण्यात आला आहे. मात्र सध्याची असलेली हेल्पलाइन कुचकामी ठरत आहे.