शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला चालक प्रक्रियेला महामंडळाकडून ब्रेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 06:40 IST

महामंडळाच्या परीक्षेत पास होऊनही एसटी चालक होण्याचे महिला प्रवाशांचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. कारण एसटी महामंडळाने घेतलेल्या चालक परीक्षेत २०० महिला उत्तीर्ण झाल्या. मात्र.

- महेश चेमटेमुंबई  - महामंडळाच्या परीक्षेत पास होऊनही एसटी चालक होण्याचे महिला प्रवाशांचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. कारण एसटी महामंडळाने घेतलेल्या चालक परीक्षेत २०० महिला उत्तीर्ण झाल्या. मात्र, परीक्षेत पास होऊनदेखील महामंडळाने या महिलांच्या पुढील चाचणीबाबत कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. यामुळे महिला चालक प्रक्रियेला महामंडळाकडून ‘ब्रेक’ लागला असल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री आणिएसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळात ‘महिला चालकदेखील एसटी चालविणार’ अशी घोषणा केली. त्यानुसार,एसटी महामंडळात ७ हजार ९२९ चालक-वाहकांची पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली. यात सुमारे ४४५ महिला चालकांनी अर्ज केले. त्यापैकी २०० महिला परीक्षेत पास झाल्या. मात्र त्यानंतर, संबंधित महिला चालकांच्या पुढील प्रक्रिया मात्र पार पडली नाही.एसटीतील २०० महिला चालकांच्या पुढील कारवाईबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी व्यस्त आहे, नंतर बोलू’ असे सांगून उत्तर देणे टाळले. पुन्हा संपर्क साधला असता, त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.देशातील प्रवासी वाहतूक महामंडळापैकी एसटी महामंडळ सर्वात मोठे प्रवासी महामंडळ आहे. एसटीतून रोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. महामंडळाचे रोजचे उत्पन्न सुमारे २० कोटी आहे. महामंडळात एक लाखांहून अधिक कर्मचारी असून, महिला चालकांचा महामंडळात समावेश झाल्यास देशातील पहिले महिला चालक असलेले प्रवासी महामंडळ म्हणून एसटी महामंडळाचा गौरव होईल.कागदपत्रांत त्रुटी असल्याचे कारणयाबाबत महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, २०० महिला चालकांच्या भरती प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. महिला चालक भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश असल्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये महिला चालकांचादेखील समावेश करण्यात आला. महिला चालकांचा महामंडळात समावेश केला असता, महिला चालक असलेले एकमेव महामंडळ असा लौकिक एसटी महामंडळाला प्राप्त झाला असता. मात्र, २०० महिला चालकांची प्रक्रिया तूर्तास तरी स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ