एसटी कर्मचारी बुधवारपासून संपावर?
By Admin | Updated: December 16, 2015 02:03 IST2015-12-16T02:03:25+5:302015-12-16T02:03:25+5:30
एसटी महामंडळातील चार कर्मचाऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे
एसटी कर्मचारी बुधवारपासून संपावर?
ठाणे : एसटी महामंडळातील चार कर्मचाऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुनही प्रशासन मात्र याबाबत असंवेदनशील असल्याची टीका करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपुरा पगार आणि वाढती महागाई, कौटुंबिक अडचणी, गृह कर्ज, वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शिक्षण, पाल्यांचे विवाह आदी करीता लागणारा खर्च यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. यालाच कंटाळून चार कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये या चारही जणांनी मागील दोन महिन्यात आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी दिली.
इंटकने मागण्यांचे पत्रही प्रशासनाला सादर केले असून यामध्ये २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, चालक-वाहक यांचे ड्युटी अलोकेशन संगणकीकृत करुन टी -९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, चालक -वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरीता संगणकीकृत रजा व्यवस्थापन लागू करण्यात यावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रूटी दूर कराव्यात, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कॅशलेस मेडीकल सुविधा आदी मागण्या केल्या आहेत.