एसटी कर्मचा:यांना ‘आरक्षण एक्स्प्रेस’

By Admin | Updated: September 6, 2014 03:21 IST2014-09-06T03:21:33+5:302014-09-06T03:21:33+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

ST Employees: To 'Reservation Express' | एसटी कर्मचा:यांना ‘आरक्षण एक्स्प्रेस’

एसटी कर्मचा:यांना ‘आरक्षण एक्स्प्रेस’

‘बंपर’ धमाका : कामगार, कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय 
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. एसटीत नव्याने होणा:या भरतीत कर्मचा:यांच्या पाल्यांना 5 टक्के आरक्षणास तत्त्वत: मंजुरी, अपघात झाल्यास पाल्यांना अनुकंपातत्त्वावर नोकरी आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिका:याच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीस किंवा पतीस दोन महिन्यांचा मोफत पास असे निर्णय शुक्रवारी एसटी महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आले. 
पोलिसांच्या मुलांना सरळ सेवा भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा नुकताच निर्णय झाला होता. त्याआधारे एसटीत यापुढे नव्याने होणा:या नोकर भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी कामगार वर्गाकडून होत होती. ही मागणी पाहता एसटी महामंडळाकडून त्याचा अभ्यास केला जात होता. अखेर शुक्रवारी झालेल्या महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.  कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकरच पाठवला जाणार आहे. या निर्णयाबरोबरच चालक - वाहक आणि मॅकेनिकसारखा मोठय़ा कामगार वर्गालाही दिलासा देणारा निर्णय महामंडळाने घेतला आहे. चालक-वाहक किंवा मॅकेनिक यांना कामावर असताना अपघात झाला आणि  ते शारीरिकदृष्टय़ा, वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरल्यास त्यांच्या पाल्यांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी हा निर्णय फक्त मयत झालेल्या चालक-वाहक आणि मॅकेनिक यांच्यासाठी लागू होता, असे 
एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे 
यांनी सांगितले. 
वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरलेल्या व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा:यांच्या किंवा अधिका:यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा किंवा विदुर यांना दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येणार आहे. अनुकंपातत्त्वावर नोकरी आणि मोफत पास याची अंमलबजावणीही त्वरित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
सुमारे तासभर वर्कआऊट
1 सप्टेंबरपासून डिङोलच्या किमतीत देशभरात 50 पैसे व राज्यात 63 पैशांनी वाढ झाल्यामुळे महामंडळाने 1.89} भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र या प्रस्तावावर आता फेरविचार केला जात असल्याचेही गोरे म्हणाले. 
 
कामगार संघटनांकडून स्वागत
एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्वागत केले आहे.

 

Web Title: ST Employees: To 'Reservation Express'