शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:45 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्यक्ष दिवाकर रावते उपस्थित राहणार आहे.

मुंबई  - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्यक्ष दिवाकर रावते उपस्थित राहणार आहे. महामंडळाने राज्यातील महामंडळाच्या २१ संघटनांचे पदाधिकारीदेखील बोलावले आहेत. सोमवारी मुंबई सेंट्रल आगार येथे दुपारी २ वाजता होणा-या बैठकीत राज्यातील सर्व कामगारांचे लक्ष राहणार आहे.गतवर्षी दिवाळीत एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी संप पुकारला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्यात आला होता. दरम्यान, आयोग कृती समिती आणि महामंडळ यांच्यात अनेक बैठका पार पडल्या. मात्र त्यातून काही ठोस निर्णय झाला नाही. महामंडळात एक लाखाहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे २४ महिने उलटूनही वेतन करार न झाल्याने कामगारांना वेतनवाढ मिळालेली नाही. देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत राज्यातील एसटी कामगारांचे वेतन कमी आहे. आधीच वेतन कमी आणि करार न झाल्याने तब्बल २०० पेक्षा जास्त कर्मचाºयांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्ज करत स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.विशेष बैठक म्हणजे नेमके काय?महामंडळातील कर्मचाºयांच्या वेतनासंबंधी मान्यताप्राप्त संघटना म्हणून तडजोड करण्याचा अधिकार महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला आहे. याआधीदेखील वाटाघाटीच्या अनेक बैठका पार पडल्या. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार ७४१ कोटींच्या प्रस्तावापुढे जाण्यास एसटी प्रशासन तयार नसल्याने या बैठका निष्फळ ठरल्या. परिणामी सोमवारी होणाºया बैठकीत महामंडळातील२१ संघटना उपस्थित राहतील. राज्यातील सर्व संघटनांसमक्षबैठक होणार असल्याने ठोस निर्णय अपेक्षित आहे.महामंडळाचा निर्णय स्वागतार्हकामगारांच्या वेतनवाढीसाठी मान्यताप्राप्त संघटनेने महामंडळाला पत्र दिले होते. सोमवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनादेखील बोलावण्यात आले आहे. महामंडळाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या बैठकीत महामंडळाने उच्चस्तरीय समितीच्या असमाधानकारक शिफारशीपेक्षा पुढे जात बोलणी केल्यास कामगारांना त्वरित वेतनवाढ मिळणे शक्य आहे.- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना (मान्यताप्राप्त)‘इन कॅमेरा’ बैठक घ्या...वेतनकरार संपून २४ महिनेउलटूनही ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. परिणामी राज्यातील विविध आगारांतील कामगारांनी समाजमाध्यमातून संघटना आणि महामंडळ यांच्यातील वेतनाबाबत होणाºया बैठका ‘इन कॅमेरा’घेण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार