शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: एसटी चालकाचा जीवघेणा 'पराक्रम', पुरातून नेली प्रवाशांनी भरलेली बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:49 IST

Raigad ST in Flood, video viral: रायगडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

ठळक मुद्देमागील दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे

रायगड: मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळत आहे. या पूरामुळे अनेक ठिकाणी रस्ते-पूल पाण्याखाली गेले आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नदीला पूर आलेला असतानाही पुराच्या पाण्यातून 52 प्रवासी बसलेली एसटी बस चालकाने नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने केलेल्या या 'पराक्रमा'मुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

चालकाचे निलंबन

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी बंधारा उलटून पाणी ओसंडून वाहत होते. या पाण्यात खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. तरीदेखील एसटीमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या पाण्यातून एसटी नेण्याचा मुर्खपणा केला. त्याच्या या पराक्रमामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. परंतु, केवळ सुदैवाने ही एसटी बस रस्त्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्या चालकाचे निलंबन केले आहे. याबाबत ट्विट करुन महामंडळाने ही माहिती दिली.

कोकणात पावसाची जोरदार हजेरीमागील दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, रविवारी जिल्ह्यातील मुरूड , श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर भागात पावसाने धुवादार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडBus Driverबसचालकfloodपूरriverनदी