शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची झाली दिवाळी.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:42 IST

शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे.

ठळक मुद्देयावर्षी नियमित बससह जादा बसमध्ये आरामदायी वातानुकुलित शिवशाही बसचा समावेशहीयावर्षी पहिल्यांदाच मार्गावरील विविध थांब्यांपासूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध विशेष म्हणजे यावर्षी २०१६ च्या तुलनेत बसची एकुण धाव कमी

पुणे : दिवाळीत दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांची पावले यंदा एस.टी. महामंडळाच्या शिवशाहीकडे वळाली. त्यामुळे शिवशाहीमुळे एसटीची दिवाळी झाल्याचे चित्र आहे. एसटीच्या पुणे विभागाचे संचलन कमी होऊनही यावर्षी उत्पन्नात जवळपास ४१ लाखांहून अधिक वाढ झाली आहे. शिवशाहीने खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर दिल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे ट्रॅव्हल व्यावसायिकांनी मान्य केले. दिवाळीनिमित्त एसटीकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षी पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त जवळपास ४५० जादा बस सोडल्या. यावर्षी नियमित बससह जादा बसमध्ये आरामदायी वातानुकुलित शिवशाही बसचा समावेशही होता. मागील वर्षी या बस महामंडळामध्ये दाखल झाल्या असल्या तरी दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संचलन होऊ शकले नाही. त्यानंतर यंदा दिवाळीपर्यंत दिवसेंदिवस शिवशाहीची मागणी वाढत गेली. दिवाळीतही खुप चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाला दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ७ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये शिवशाहीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा १ कोटींहून अधिक आहे. पुणे विभागात ८५ शिवशाही बस असून त्यामध्ये ८३ बस आसनी तर दोन बस शयनयान आहेत. २०१६ मध्ये दिवाळीच्या काळात पुणे विभागाला ७ कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये यंदा सुमारे ४२ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यावर्षी २०१६ च्या तुलनेत बसची एकुण धाव कमी झाली आहे. २०१६ मध्ये विभागातील बसचे एकुण किलोमीटर २१ लाख ३९ हजार एवढे होते. यावर्षी त्यामध्ये १ कोटी ६४ लाखांनी घट झाली. असे असूनही विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. दि. ६ नोव्हेंबरनंतरही एसटीला मोठी गर्दी आहे. त्यामुळे एकुण दिवाळीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच मार्गावरील विविध थांब्यांपासूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे अधिकाºयांनी सांगितले. ---------------पुणे विभागाचे दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्न -वर्ष                उत्पन्न            एकुण धाव (किलोमीटर)२०१६         ७ कोटी १० लाख                १९ लाख ७५ हजार२०१८        ७ कोटी ५२ लाख                २१ लाख ३९ हजार

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीDiwakar Raoteदिवाकर रावतेShivshahiशिवशाहीpassengerप्रवासी