शहरं
Join us  
Trending Stories
1
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
2
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
3
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
4
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
5
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
6
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
8
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
9
अग्रलेख: हा कसला आततायीपणा? तामिळनाडूचा निर्णय देशाहिताचा नाही
10
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
11
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
12
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
13
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
15
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
16
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
17
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
18
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
19
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
20
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट

एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:26 IST

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यातील अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सुरू केलेल्या विशेष सवलत योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये आतापर्यंत ६ हजार ४९५ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या सवलतींचा आतापर्यंत १८१ कोटी ६२ लाख प्रवाशांनी लाभ घेतला असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यातील अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सुरू केलेल्या विशेष सवलत योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. 

एसटी महामंडळाच्या विविध योजना 

एसटी महामंडळाच्या एकूण ३३ पेक्षा अधिक योजना अधिक आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, विद्यार्थ्यांना पासमध्ये सवलत, पत्रकारांना सवलत अशा विविध योजनांचा त्यामध्ये सहभाग आहे.

योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ 

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि सर्व महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना या महत्त्वपूर्ण योजना अनुक्रमे २६ ऑगस्ट २०२२ आणि १७ मार्च २०२३ रोजी लागू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक