एसटी महामंडळाला गरज एसी बसची
By Admin | Updated: December 31, 2015 01:37 IST2015-12-31T01:37:03+5:302015-12-31T01:37:03+5:30
एसटी महामंडळाकडे एसी बसची कमतरता असून, अजूनही ताफ्यात स्वत:च्या एसी बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना विना‘एसी’ बसमधून प्रवास करावा लागत आहे. जवळपास ५0 पेक्षा

एसटी महामंडळाला गरज एसी बसची
मुंबई : एसटी महामंडळाकडे एसी बसची कमतरता असून, अजूनही ताफ्यात स्वत:च्या एसी बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना विना‘एसी’ बसमधून प्रवास करावा लागत आहे. जवळपास ५0 पेक्षा जास्त एसी बसची कमतरता महामंडळाला भासत असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
नादुरुस्त होत असलेल्या बसेस आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप पाहता, महामंडळाने स्वत:च्या ७0 एसी बस विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, व्होल्वो कंपनीच्या ३३ तर स्कॅनिया कंपनीच्या ३७ बसचा समावेश आहे. या बस दाखल होणार असल्याने, ताफ्यात असलेल्या सध्याच्या एसी बस महामंडळाकडून टप्प्याटप्याने काढून टाकण्यात आल्या.
बसचे असलेले वजन क्षमतेपेक्षा अधिक असल्याने आणि काही तांत्रिक कारणांमुळे स्कॅनिया बसचा प्रस्ताव मागे पडला.
स्कॅनिया कंपनीच्या बसबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यासाठी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देतानाच, त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्याची पडताळणी करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सांगितले.
५०० बसेस भाड्याने घेणार
एसटी महामंडळाकडून ५00 बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. यात
एसी-स्लीपर बसचाही समावेश आहे. त्याबाबतही लवकर निर्णय घेऊन त्याही दाखल केल्या जातील. त्यामुळे एसी बस प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.