स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये एसटी बसेसची तोडफोड

By Admin | Updated: May 1, 2016 09:38 IST2016-05-01T08:27:58+5:302016-05-01T09:38:45+5:30

यवतमाळमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने यवतमाळ एसटी डेपोमध्ये पाच एसटी बसेसची तोडफोड केली.

ST buses collide in Yavatmal for demand of separate Vidarbha | स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये एसटी बसेसची तोडफोड

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये एसटी बसेसची तोडफोड

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १ - महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना यवतमाळमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने यवतमाळ एसटी डेपोमध्ये पाच एसटी बसेसची तोडफोड केली. 
 
सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. युवराज साळवी असे या तरुणाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. 
 
स्वतंत्र विदर्भाचे समर्थक राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि अन्य स्वतंत्र विदर्भाच्या पुरस्कर्त्यांनी महाराष्ट्र दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Web Title: ST buses collide in Yavatmal for demand of separate Vidarbha