शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बंद पडल्यास कोणत्याही बसमधून करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 21:11 IST

अनेकदा मार्गावर बसमधील तांत्रिक बिघाड, अपघात किंवा इतर कारणांमुळे बस बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो.

ठळक मुद्देआतापर्यंत ज्या श्रेणीतील बस बंद त्या श्रेणीतील बसमधूनच संबंधित प्रवाशांना होता प्रवास एसटीने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व बसमधून प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय

पुणे : कोणत्याही कारणांमुळे एसटी महामंडळाची बस बंद पडली किंवा अन्य समस्या निर्माण झाल्यास प्रवाशांना आता कोणत्याही उच्च श्रेणीच्या बसमधूनही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारले जाणार नाही. पुर्वी साधी बस बंद पडली असल्यास त्याच प्रकारच्या बसमधून जाण्याची मुभा प्रवाशांना दिली जात होती. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. अनेकदा मार्गावर बसमधील तांत्रिक बिघाड, अपघात किंवा इतर कारणांमुळे बस बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. आतापर्यंत ज्या श्रेणीतील बस बंद पडली आहे, त्या श्रेणीतील बसमधूनच संबंधित प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. तर इतर बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते. पण अनेक मार्गांवर बसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना तासनतास बस उपलब्ध होत नव्हती. उच्च श्रेणीतील बसमधून प्रवास करणे अनेक प्रवाशांना परवडणारेही नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत होती. यापार्श्वभुमीवर एसटीने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व बसमधून प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारच्या बसचा मार्गात खोळंबा झाल्यास बसमधील प्रवाशांना अन्य कोणत्याही श्रेणीतील बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार नाहीत. पासधारकांनाही या सुविधे फायदा मिळणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक लवकरच सर्व आगारांना पाठविले जाणार आहे. परिपत्रकानुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कर्मचाºयांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स