शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:43 IST

ST BUS News: राज्यातील विविध विभागांमध्ये शालेय सहलींमध्ये एसटीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

ST BUS News: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल २२४३ बस राज्याच्या विविध आगारातून शालेय सहलींसाठी देण्यात आल्या. यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे.

दिवाळी संपली की शाळेच्या मुलांना वेध लागतात ते  शालेय सहलीचे! शालेय सहल हा विद्यार्थी जीवनातील एक हळवा कोपरा असतो. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला एसटी महामंडळ बस उपलब्ध करून देते. शासनाने एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे . त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहलीचा अनुभव घेता येतो. यंदा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. नव्या कोऱ्या एसटीतून राज्यभरातील हजारो विद्यार्थी गड-किल्ले, नयनरम्य समुद्र किनारे, धार्मिक स्थळे यांच्या सहलीला जाऊ लागली. एका नोव्हेंबर महिन्यात तब्बल २२४३ एसटी बसमधून सुमारे १ लाख विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहलीचा आनंद घेतला आहे.

कोल्हापूर विभागाची सर्वोत्कृष्ट कामगिरी

यंदा राज्यातील विविध विभागांमध्ये एसटीच्या शालेय सहलींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२५ मध्ये बससंख्या आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. एसटीच्या ३१ विभागांपैकी कोल्हापूर विभागाने ३७५ एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. त्यानंतर सांगली (२११ बस) व रत्नागिरी (२०१ बस) यांनी चांगली कामगिरी केली आहे.

दरम्यान, डिसेंबर व जानेवारी महिन्यात विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या कोऱ्या बस उपलब्ध करून देण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असून स्वस्त, सुरक्षित आणि आनंददायी सहलीसाठी सर्व शाळांनी एसटीच्या बसेस आरक्षित कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : ST Buses See Huge Demand for School Trips, Earns ₹10 Crore

Web Summary : Maharashtra ST Corporation earned ₹10.85 crore in November by providing 2243 buses for school trips. Kolhapur division topped with ₹1.77 crore revenue. Minister Sarnaik encourages schools to book ST buses for safe travel.
टॅग्स :state transportएसटीSchoolशाळाpratap sarnaikप्रताप सरनाईक