शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

By नितीन जगताप | Published: June 08, 2023 9:22 PM

Madhavi Salve: एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होतंं. परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत. 

- नितीन जगतापमुंबई :  जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी अस नारीशक्तीच्या बाबतीत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. चूल आणि मूल" यावर मर्यादित न राहता पाळण्याच्या दोरीसह, बसची बेलदोरी हाती धरत बस कंडक्टरची कामगिरी देखील सक्षमपणे पार पाडली. परंतु अद्याप एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होत.परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत.  आता राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक सुद्धा रुजू झाल्या असून नुकतेच  माधवी साळवे यांनी  "सिन्नर - नाशिक" मार्गावर एसटी.बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

सिन्नर तालुक्यातील प्रवाशांचे कौतुकाचे बोल सर्व महिला चालकांना प्रोत्साहन देत आहे. महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के  सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी देत आहे याची  नागरिक प्रशंसा करत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे आश्वासक पाऊल आहे.

सन. 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिला चालक तथा वाहक या पदासाठी निवडल्या गेल्या.  त्यांन एसटी एसटी महामंडळाने स्वतःच्या खर्चाने अवजड वाहन चालवण्याचे  एक वर्ष ट्रेनिंग दिले. पुढे त्यांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा अनुभव दिली.(जो एसटी चा चालक बनण्यासाठी आवश्यक आहे)त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत आज रुजू करून घेण्यात आले आहे. 

एकूण पात्र उमेदवार - २०६अवजड वाहन चालन प्रशिक्षन सुरु-  ९प्राथमिक वाहन चाचणी बाकी - २४८० दिवसाचे प्रशिक्षण सुरु - ७३   प्रशिक्षण पूर्ण - २० गैरहजर /अपात्र - ४८वैद्यकीय तपासणी प्रलंबित - ४ नेमणूक दिलेल्या महिला - २८

२०१९ मध्ये थेट भरती योजनेत तब्बल २०६ महिला चालक पात्र ठरल्या होत्या आणि त्यापैकी आतापर्यंत २८ जणांची भरती करण्यात आली आहे.वजड वाहन परवाना असलेल्या महिला चालकांना तीन महिन्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले, तर ज्यांच्याकडे हा परवाना नव्हता त्यांना पूर्ण एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आले.  त्याच्या शेवटी एक चाचणी घेण्यात आली आणि ज्यांनी ती उत्तीर्ण केली त्यांना आणखी ८० दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.    - शेखर चन्ने , उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , एसटी महामंडळ 

टॅग्स :state transportएसटीWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र