शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

MSRTC Recruitment 2026: ST महामंडळात महाभरती होणार, १७ हजार ४८२ पदे भरणार; कोणाला प्राधान्य मिळणार? पाहा, सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:46 IST

ST Bus Mega Bharti 2026 News: याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

MSRTC Recruitment 2026 Mega Bharti: परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून एकूण १७ हजार ४८२ पदांची महाभरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळात सध्या चालक व वाहकांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. त्यासाठी चालक आणि वाहकांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भविष्यात नियमित भरती प्रक्रियेत  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना प्राधान्य देण्याचा विचार शासन करीत आहे.

दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव

एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्तावही सरकारकडून तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन हजार बसांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्सला सुमारे २१०० बस खरेदीचा आदेश देण्यात आला असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.

प्रवाशांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध 

परिवहन मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत असले तरी प्रवाशांना विविध सवलती देण्याचे सामाजिक दायित्व राज्य सरकार पार पाडत आहे. महिलांना ५० टक्के भाडे सवलत, तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांसारख्या योजना सुरू आहेत. विधानमंडळ सदस्य, पत्रकार यांनाही काही प्रमाणात प्रवास सवलती दिल्या जातात. या सुविधा देताना एसटीला आर्थिक ताण सहन करावा लागतो, तरीही प्रवाशांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एसटी ही ग्रामीण भागातील जीवनरेखा आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी चालक-वाहकांची भरती, नवीन बस खरेदी आणि व्यवस्थापन सुधारणा या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mega recruitment in ST Corporation, 17,482 posts to be filled.

Web Summary : ST Corporation will fill 17,482 posts, prioritizing contract workers. The government plans annual bus purchases and is committed to passenger benefits despite financial constraints, ensuring better rural service.
टॅग्स :state transportएसटीState Governmentराज्य सरकारpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेनाjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी