एसटी बस - कंटेनरच्या अपघातात चार ठार
By Admin | Updated: September 20, 2016 19:16 IST2016-09-20T19:16:40+5:302016-09-20T19:16:40+5:30
चाकण-तळेगाव दाभाडे मार्गावरील माळवाडी येथे एसटी बस आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

एसटी बस - कंटेनरच्या अपघातात चार ठार
ऑनलाइन लोकमत
तळेगाव दाभाडे, दि. २० : चाकण-तळेगाव दाभाडे मार्गावरील माळवाडी येथे एसटी बस आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. भिकु गुलाबराव जाधव (वय ६५), शैला विलास भागीत (वय २८), मुश्रुफ जमादार (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. तर एका मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. चार जणांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिरुर येथून कुर्ला कडे निघालेली एसटी बस तळेगावजवळील माळवाडी येथे आली असता समोरुन येणारया कंटेनरची एसटीला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.