जळगाव : प्रवाशाने हात दाखवूनही एस.टी. बस न थांबवल्याने वाहक मिलिंद साळुंखे आणि चालक सोपान सपकाळे यांना महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत संबंधित प्रवाशाने आॅनलाइन तक्रार केली होती, त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.आठ दिवसांपूर्वी जळगाव-चोपडा बस आगारातून बाहेर निघाली़ या बसला एका प्रवाशाने हात दिला़, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून बस निघून गेली. संबंधित प्रवाशाने महामंडळाच्या वेबसाईटवर तक्रार नोंदविली़ विभाग नियंत्रक चेतना खिरवडकर यांनी त्याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहक, चालक यांना म्हणणे मांडण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
हात दाखवूनही बस न थांबवल्याने वाहक, चालकाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:20 IST