लोणावळ्याजवळ एसटीला अपघात

By Admin | Updated: October 3, 2014 20:23 IST2014-10-03T19:46:12+5:302014-10-03T20:23:00+5:30

लोणावळ्याजवळ निमआराम एसटी बस ६० फुट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जणांना आपला प्राण गमावावा लागला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत

ST accident near Lonavla | लोणावळ्याजवळ एसटीला अपघात

लोणावळ्याजवळ एसटीला अपघात

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.३ -  लोणावळ्याजवळ निमआराम एसटी बस ६० फुट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जणांना आपला प्राण गमावावा लागला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.  शुक्रवारी संध्याकाळी ही एसटी ५:१५ च्या सुमारास साता-याहून मुंबईला येत असताना लोणावळ्यातील पांगोळी येथे हा अपघात झाल्याचे कळताच लोणावळा शहर पोलीस ताक्ताळ घटनास्थळी दाखल झाले. बाचवकार्यात मदतीसाठी ४  क्रेन, ५ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

 MH - 07- 9038  या क्रमांकाची ही निमआराम एसटीबस असून या बसमध्ये ३० प्रवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काही प्रवासी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमधील प्रवाशांनी पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि शिवदुर्ग ट्रेकिंग क्लबचे आभार मानले आहेत. 
 

Web Title: ST accident near Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.