शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 3:19 PM

SSC Result 2020: विभागवार निकालात शेवटून दुसरा असलेला लातूर विभागात पैकीचे पैकी गुण मिळवण्यात पहिला

मुंबई: राज्य शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (२९ जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे.राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. यातले तब्बल १५१ विद्यार्थी एकट्या लातूरचे आहेत. म्हणजेच १०० टक्के गुण मिळवणारे राज्यातले ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. लातूरनंतर १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद विभागात आहेत. औरंगाबाद विभागातल्या ३६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर कोल्हापूर (१५), पुणे, अमरावती (प्रत्येकी १२), कोकण (११), नागपूर (३), मुंबई (२) या विभागांचा क्रमांक लागतो. तर नाशिक विभागातल्या एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळवता आलेले नाहीत. सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या बाबतीत लातूर विभागानं कायमच आघाडी राखली आहे. २०१९ मध्ये राज्यात केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवता आले होते. त्यातले १६ विद्यार्थी एकट्या लातूर विभागाचे होते. २०१८ मध्ये राज्यात १२५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. यापैकी ७० जण लातूर विभागातले होते. २०१७ मध्ये १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवण्याची किमया साधली. त्यातही लातूरनं दबदबा राखला होता. त्यावेळी लातूर विभागातल्या ४५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले होते. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल