शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा घेण्याचे आदेश देणे योग्य आहे का?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:17 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने १९ एप्रिल रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला

मुंबई : कोरोनामुळे सध्या दहावीची परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याने राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून परीक्षा घेण्याचा आदेश देणे योग्य आहे का? असे उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने १९ एप्रिल रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मंगळवारी या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.न्यायालयाने कुलकर्णी यांचे वकील उदय वारुंजीकर यांना याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने वारुंजीकर यांना गुरुवारपर्यंत मुदत दिली.                                               आमचे सकृतदर्शनी निरीक्षण असे आहे की, राज्य सरकारने घेतलेले काही निर्णय कदाचित योग्य नसतील; परंतु, आम्ही कितपत आमच्या अधिकारांचा वापर करायचा, याबाबत आम्हाला जाणीव आहे, असे न्यायालयाने म्हटले.जर राज्य सरकार म्हणत असेल की दहावीची परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही, तर आम्ही त्यात हस्तक्षेप करून राज्यातील परिस्थिती परीक्षेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे परीक्षा घ्या, असे सांगू का? असे न्यायालयाने म्हटले.कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही भयानक आहे. या वर्षी कोरोनाने प्रामुख्याने तरुणांना लक्ष्य केले आहे. मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, असे म्हणत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट